Maharashtra Lokayukta Bill : विधान परिषदेत मांडलं जाणार महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक, मंजूर होणार?

महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक आज विधान परिषदेत मांडण्यात येणार आहे.. विधेयक आज मंजूर होणार की विरोधक संयुक्त समितीकडे पाठवण्याची मागणी करणार ते पाहावं लागेल.. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वाचं विधेयक आहे. मात्र महत्त्वाचं म्हणजे भविष्यात जर खुद्द मुख्यमंत्र्यांविरोधातील तक्रार लोकायुक्तांकडे गेली, तर त्यासाठी काही विशेष अटीशर्ती या विधेयकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.. उदाहरणार्थ, विधानसभेच्या दोन तृतीयांश सदस्यांची मान्यता मिळाली तरच लोकायुक्त मुख्यमंत्र्यांची चौकशी करू शकतील.. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola