Maharashtra Lok Sabha Result : महाराष्ट्रात शरद पवारांच्या स्ट्राईक रेट सर्वात जास्त

Continues below advertisement

Maharashtra Lok Sabha Result : महाराष्ट्रात शरद पवारांच्या स्ट्राईक रेट सर्वात जास्त

येत्या काही दिवसांमध्ये इंडिया आघाडीकडून केंद्रात सत्तास्थापनेसाठी दावा करण्यात येईल. त्यासाठी आज दिल्लीत इंडिया आघाडीतील घटकपक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केला जाईल, असे वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. ते मंगळवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबईतील शिवसेना भवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

आपल्या देशातील सर्वसामान्य माणसांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. मी त्यासाठी नागरिकांचे अभिनंदन करतो. सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी त्यांना एका बोटाने रोखू शकतो, हे जनतेने दाखवून दिले, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

पंतप्रधानपदाचा चेहरा निवडणार - उद्धव ठाकरे

सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडीने दावा करायला पाहिजे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मी उद्या संध्याकाळी दिल्लीत जाईन. संजय राऊत आणि अनिल देसाई सकाळी दिल्लीत दाखल होतील. या बैठकीत आम्ही पंतप्रधानपदाचा चेहरा ठरवू. आम्ही इंडिया आघाडी तयार केली. तेव्हा आमच्यापैकी कोणाच्याही मनात पंतप्रधानपदाची इच्छा नव्हती. देशाला हुकूमशाहीपासून वाचवणे, हा आमचा प्राथमिक उद्देश होता. उद्याच्या बैठकीत आम्ही पंतप्रधानपदाचा चेहरा सर्वानुमते ठरवू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram