Maharashtra Unlock : अनलॉकबाबतचा संभ्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूर करणार का?
राज्यातील निर्बंध हटवलेले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलं आहे. यानंतर विजय वडेट्टीवार यांनी यू टर्न घेतला आहे. अनलॉकच्या निर्णयात कोणतीही गफलत नाही, 5 टप्प्यात अनलॉकच्या निर्णयाला तत्वत: मान्यता देण्यात आली असून अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात म्हटलं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.