Maharashtra Lockdown | इतिहासात पहिल्यांदाच... कोरोनामुळे सांगलीत हळदीचे लिलाव प्रथमच ऑनलाईन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Apr 2020 01:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सांगलीची बाजार पेठ ही हळदीसाठी प्रसिद्ध. मात्र कोरोनाचा या बाजारपेठेला देखील मोठा फटका बसला असून कोरोनामुळे सांगली बाजार समितीच्या आजपर्यंतच्या इतिहासात हळदीचे लिलाव प्रथमच ऑनलाईन पद्धतीने पार पडत आहेत. आज प्रायोगिक तत्त्वावर ऑनलाईन सौदे पार पडतील. हळद सौद्यास दहा दिवसापूर्वी प्रारंभ होणार होता परंतु गर्दीचा धोका लक्षात घेऊन सौदे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ऐन हंगामात सौदे न झाल्यास हळदीचे दर कमी होतील अशी भीती असल्याने हळदीचे उघड पद्धतीने लिलाव न करता ऑनलाईन लिलाव करणे अत्यावश्यक आहे असे आदेश जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिले होते.