Maharashtra Lockdown : 1 जूननंतर राज्यात 'ब्रेक द चेन'च्या नियमात शिथिलता येण्याची शक्यता

Continues below advertisement

मुंबई : देशात कोरोना संसर्ग फोफावत असताना मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात काहीसं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. अशातच सध्या लागू करण्यात असणाऱ्या लॉकडाऊनला येत्या काळात कोणतं वळण मिळणार याचसंदर्भातील प्रश्न जनतेच्या मनात घर करत आहेत. 

राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे, तूर्तास राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मात्र लॉकडाऊन शिथिल केला जाणार आहे अशी माहिती विश्वासार्ह सूत्रांनी दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram