Maharashtra Local Body Polls: राजकीय पक्षांची स्वबळाची चाचपणी, युती की आघाडी?
Continues below advertisement
महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या स्तरावर तयारी करत आहे. गेल्या महिनाभरातील राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या वक्तव्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, प्रत्येक पक्ष स्वबळाची चाचपणी करत आहे. शक्य असेल तिथे युती किंवा आघाडी करून लढण्याचा, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा पवित्रा अनेक पक्षांनी घेतला आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी तयारी सुरू झाली आहे. या संदर्भात झालेल्या बैठकांमध्ये, "अंतशेवटी एकत्र लढायचं असल्यामुळे जिथं आमचं जमेल तिथं युतीनं न जमेल तिथं स्वबळावर आणि एकमेकांवर टीका न करता झेंडा युतीचा फडकवायचं ठरलेलं आहे" असे मत व्यक्त करण्यात आले आहे. एरवी एकत्र राहण्याच्या आणाभाका घेणारे मित्र पक्ष सध्या कार्यकर्त्यांवर अन्याय नको असे म्हणत स्वबळाची चाचपणी करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement