Local Body Polls: प्रभाग रचना आणि आरक्षणावरील याचिकांवर २७ नोव्हेंबरला अंतिम सुनावणी
Continues below advertisement
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रभाग रचना आणि आरक्षणासंदर्भातील एकूण ४९ याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 'निवडणुकीच्या तयारीच्या सर्व कृती या याचिकांच्या अंतिम निकालाच्या अधीन असतील', असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाने राज्य सरकारला उत्तर दाखल करण्यासाठी २४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली असून, २७ नोव्हेंबर रोजी या सर्व याचिकांवर अंतिम सुनावणी होणार आहे. याशिवाय, निवडणुकीत VVPAT मशीन्स न वापरण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरही नागपूर खंडपीठाने आयोगाला नोटीस बजावली आहे. सुप्रीम कोर्टाने जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले असले तरी, या कायदेशीर लढाईमुळे निवडणुकांचे भवितव्य काय असेल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement