Maharashtra Local Body Elections | आगामी स्थानिक निवडणुकांसाठी भाजप अॅक्शन मोडवर

Continues below advertisement
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष ॲक्शन मोडवर आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निवडणुकांच्या तयारीसाठी बैठकांचे आयोजन केले आहे. तीन दिवसांमध्ये मुख्यमंत्री सहा विभागांच्या बैठका घेणार आहेत. आज नाशिक आणि मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडतील. उद्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामधील पदाधिकारी तर तेरा ऑक्टोबरला अमरावती आणि नागपुरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका होणार आहेत. आज नाशिकमध्ये फडणविसांसह गिरीश महाजन, राधाकृष्ण विखेपाटील, रवींद्र चव्हाण, जयकुमार रावल, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांसारखे प्रमुख नेते उपस्थित राहतील. या बैठकांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अजेंडा आणि मुद्द्यांवर मार्गदर्शन केले जाईल. उत्तर महाराष्ट्रातून भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये शिवसेना पक्षाच्या बूथप्रमुखांची बैठक घेतली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांनीही नाशिकमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री आज काय उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola