Election Commission PC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर, 2 डिसेंबरला मतदान

Continues below advertisement
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली. विरोधकांकडून होत असलेल्या दबावाच्या आरोपांवर, 'निवडणूक कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही', असे वाघमारे यांनी स्पष्ट केले. या घोषणेनुसार, पहिल्या टप्प्यात २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणी होईल. या निवडणुकीतून एकूण ६,८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्ष निवडले जातील. मतदार याद्यांमधील दुबार नावांच्या गोंधळावर बोलताना, संभाव्य दुबार मतदारांची शहानिशा करूनच मतदान करू दिले जाईल, असे आयोगाने सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी सर्व निवडणुका घेणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola