Local Body Elections : 'एकमत न झाल्यास युती-आघाडी तुटणार', Mahayuti-MVA मध्ये जागांवरून प्रचंड गोंधळ
Continues below advertisement
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटपाचे चित्र अस्पष्ट असल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. 'नगराध्यक्ष पदावर एकमत होणार नसेल तर त्या ठिकाणी युती किंवा आघाडी तुटताना आपल्याला दिसेल आणि त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली सर्व पक्ष एकमेकांसमोर उभे राहतील', असे मत राजकीय विश्लेषक रजत वशिष्ठ यांनी व्यक्त केले. अनेक जिल्ह्यांमध्ये, विशेषतः विदर्भात, दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपावर एकमत झालेले नाही, त्यामुळे बहुतांश पक्ष 'स्वबळा'वर लढण्याची तयारी करत आहेत. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी राजकीय समीकरणे उदयास येत आहेत. २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement