Maharashtra : राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य आज ठरण्याची शक्यता

Continues below advertisement

राज्यात प्रलंबित असलेल्या महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात महत्त्वाच्या सुनावण्या आहेत. मुंबई महापालिकेची प्रभाग रचना वाढण्याचा निर्णय रद्द करून ती पूर्ववत करण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आलंय. या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. तर निवडणूक पुढे ढकललेल्या ९२ नगरपरिषदांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण मिळणार की नाही आणि तिथं थेट नगराध्यक्ष निवडणूक होणार की नाही याचा फैसला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. या दोन्ही याचिकांवर राज्यातील नगरपरिषद, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचं भवितव्य अवलंबून आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram