Maharashtra Local Body Election : बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली
Nagarparishad Election: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. आज दुपारी पाच वाजता या निवडणुकांसाठीचा प्रचार संपुष्टात येईल. त्यानंतर मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. मात्र, त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाने बारामती, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषेदची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. आता फलटण आणि महाबळेश्वर येथील मतदानप्रक्रिया अनुक्रमे 20 आणि 21 डिसेंबर रोजी पार पडेल. जिल्हा न्यायालय निवडणूक प्रक्रियेबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने निकाल देण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी घेतला आहे.
बारामती, महाबळेश्वर, फलटणची निवडणूक पुढे ढकलली
निवडणूक आयोगाकडून परिपत्रक जारी
बारामती नगराध्यक्षपद उमेदवारासह ७ प्रभागातील उमेदवारांविरोधात याचिका
बारामती, फलटण, महाबळेश्वरचं थेट मतदान २० डिसेंबरला