सोलापूरला मिळणारा लिक्विड ऑक्सिजनचा साठा निम्म्याने घटला; ऑक्सिजन तुटवड्याने रुग्णांचे हाल

Continues below advertisement

एका बाजूला सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरसह अनेक तालुक्यात कोरोना मृत्यूचा आकडा दिवसागणिक वाढत असताना प्रशासनाकडून लिक्विड ऑक्सिजनचा कोटा निम्म्याने कमी झाल्याने रुग्णांची तडफड वाढू लागली आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने 2 मे रोजी ऑक्सिजन वाटपात फेरबदल करताना सोलापूर जिल्ह्याचा INOX चा कोटा 10 टनावरुन 5 टन केल्याने टेम्भूर्णी येथील ऑक्सिजन निर्मिती कारखाना 24 तास चालवूनही गाड्यांची गर्दी वाढली आहे. रुग्णालयात मात्र रुग्णांची ऑक्सिजनअभावी तडफड वाढू लागली आहे. एका बाजूला सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना येथे येणारा 10 टनाचा लिक्विड ऑक्सिजनचा साठा कसा पुरवठी पडणार होता. यातच या नव्या आदेशानंतर परिस्थिती गंभीर झाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram