Maharashtra Kustigir Parishad : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वादात पवारांची एन्ट्री?

Continues below advertisement

Maharashtra Kustigir Parishad : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वादात पवारांची एन्ट्री?


महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा वाद आणखी चिघळण्याची शक्यताय. आता शरद पवारांनी देखील या वादात उडी घ्यायच ठरवलंय.  शरद पवारांच्या उपस्थितीत आज पुण्यात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय. या सभेला राज्यभरातील जिल्हा कुस्ती संघ आणि सहयोगी संघ, असे मिळून 45 संघांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आलय. भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली नवीन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अस्तित्वात आली.  या परिषदेकडून पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच आयोजन देखील करण्यात आलं.  मात्र बाळासाहेब लांडगे यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या निर्णयाला न्यायालयात आवाहन दिलं, आणि मोठ्या वादाला सुरुवात झाली. याच वादाच्या पार्श्वभूमीवर, पुढे कोणती भूमिका घ्यायची, यावर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola