Sikandar Shaikh Arrest: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, कटकारस्थानाचा संशय
Continues below advertisement
महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) पैलवान सिकंदर शेख (Sikandar Shaikh) याला पंजाब पोलिसांनी (Punjab Police) अवैध पिस्तूल विक्री प्रकरणी अटक केली आहे, ज्यामुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या अटकेनंतर हिंद केसरी संतोष वेताळ (Santosh Vetal) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सिकंदरच्या समर्थनात भूमिका घेतली आहे. 'उत्तर भारतातील पैलवानांच्या छाताडावरती बसण्याचं काम हे सिकंदरनं केल्यामुळे त्याला अडकविण्यात आलं,' असा थेट दावा हिंद केसरी संतोष वेताळ यांनी केला आहे. सिकंदर वर्षाला कोट्यवधी रुपये कमावतो, त्याला पिस्तूल विकण्याची गरज काय, असा सवालही वेताळ यांनी विचारला. तर दुसरीकडे, सिकंदरची प्रगती पाहून त्याला कोणीतरी जाणीवपूर्वक अडकवल्याचा संशय आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने पंजाब सरकारशी बोलून अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पंजाब सरकारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही पवार यांनी सांगितले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement