Maharashtra Karnataka Issue : बेळगावच्या माजी महापौरांना कर्नाटक पोलिसांकडन अटक, सीमाभागात तणाव
नवी दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन देखील, बेळगाव सीमावादाचा प्रश्न धगधगताच आहे... महाराष्ट्र एकीकरण समितीनं बेळगावात आयोजित केलेल्या मेळाव्याची परवानगी अचानक रद्द करण्यात आली. बेळगावात कलम १४४ लागू करत कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे. बेळगावच्या माजी महापौरांना देखील ताब्यात घेण्यात आलं.. इकडे बेळगावात प्रवेश करण्यासाठी हसन मुश्रीफांसह महाराष्ट्रातले काही नेते निघाले होते. त्यांना कोगनोळी टोलनाक्यावर ताब्यात घेण्यात आलं. या ठिकाणी महाराष्ट्राचे नेते आणि बेळगाव पोलीस आमने सामने आले होते.. तर नागपुरात सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनातही बेळगाव सीमावादाचे पडसाद उमटले.. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली..