Maharashtra Karnataka Bus Service Started : महाराष्ट्र आणि कर्नाटक बससेवा पुन्हा सुरू
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला वाद चांगलाच चिघळलाय. महाराष्ट्रातील गाड्यांची कर्नाटकात तोडफोड झाली तर, कर्नाटकच्या बसेसना महाराष्ट्रात काळं फासलं गेलं. त्यामुळे दोन्ही बाजूंची बससेवा बंद करण्यात आली होती. आता मात्र ही बससेवा पुन्हा सुरू झालीय. कर्नाटकातून पुण्यासाठी एक बस रवाना झालीय. त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी...