Maharashtra Karnataka border | महाराष्ट्र-कर्नाटक बॉर्डरवर शिवसैनिक आणि कर्नाटक पोलीस आमनेसामने
Continues below advertisement
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी बांधवांच्या भावना दुखावणारा लाल-पिवळा ध्वज त्वरित हटवावा, अशी मागणी करत बेळगावकडे निघालेल्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी रोखलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमारही केला. सोबतच कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या सीमेतच रोखल्याचा दावा आंदोलनकांना केला. पोलिसांनी रोखल्याने शिवसैनिकांनी सीमेवरच ठाण मांडला. जोपर्यंत भगवा फडकावणार नाही, तोपर्यंत मागे फिरणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.
Continues below advertisement