Maharashtra Karnataka : महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही कर्नाटक सरकारची सीमावादात ठिणगी
Continues below advertisement
सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात पुन्हा वाद पेटला असताना त्यात आणखी एक ठिणगी पडण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, या भूमिकेचा पुनरूच्चार कर्नाटक विधिमंडळाने केलाय. याबाबत विधिमंडळात ठराव मांडण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी सांगितलंय. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन कोणीही सीमाभागांवर दावा करू नये असा सल्ला दिला होता. मात्र तरीही कर्नाटकचे मुख्यंत्री बसवराज बोम्मई आडमुठेपणाची भूमिका घेताना दिसतायत.
Continues below advertisement
Tags :
Amit Shah Basavaraj Bommai Karnataka 'Eknath Shinde 'Maharashtra Maharashtra Karnataka Border Dispute