Maharashtra Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद दिल्लीदरबारी, अमित शाह तोडगा काढणार?

Continues below advertisement

पाणी प्रश्नावरुन कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगलीच्या जत तालुक्यातील गावांवर दावा सांगितला... आणि कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादानं पुन्हा डोकं वार काढलं. दोन-एक आठवडे या मुद्द्यांवरुन महाराष्ट्रातलं वातावरण चांगलच तापलं... आणि आता हा मुद्दा दिल्लीतल चाणक्याच्या दरबारात पोहोचलाय.. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत आज सीमावादावर महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.. ज्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित असणार आहेत. आता अमित शाह महाराष्ट्र आणि कर्नाटकमधल्या सीमावादावर काय तोडगा सुचवतात याकडे फक्त या दोन राज्यांचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram