Maharashtra IT Raids : सलग चौथ्या दिवशी अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या कंपन्या ABP Majha
Continues below advertisement
अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या काही कंपन्या आणि कारखान्यांची आयकर विभागाकडून सुरु असलेली छापेमारी चौथ्या दिवशीही सुरुच आहे. तर काही कंपन्यांची चौकशी तूर्तास थांबवण्यात आली आहे..अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्याची चौकशीही आजही सुरुय... तर तिकडे बारामतीतल्या डायनामिक्स डेअरीत सलग चौथ्या दिवशी आयकरचे अधिकारी ठाण मांडून बसलेत .... दरम्यान अजित पवारांच्या दोन बहिणी डॉक्टर रजनी इंदुलकर आणि नीता पाटील यांच्या घरी आयकर विभागानं सुरु केलेली चौकशी थांबवण्यात आली आहे. पार्थ पवारांचे निकटवर्तीय सचिन शिंगारेंचा कारखाना आयान मल्टीट्रेडसंदर्भात देखील आयकरनं चौकशी तूर्तास थांबवली आहे
Continues below advertisement