HSC SSC Helpline : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइनची सुविधा ABP Majha
Continues below advertisement
राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हेल्पलाइनसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळातर्फे ४ ते ३० मार्चदरम्यान बारावीची, तर १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा होत असल्याने राज्य मंडळाने केलेल्या उपाययोजना, परीक्षेचे स्वरूप, पालक, विद्यार्थी आणि संबंधित घटकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी राज्य मंडळाने नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे.
Continues below advertisement