Maharashtra Hindi vs Marathi : राज्यात पुन्हा पेटणार मराठी हिंदी वाद

राज्य शासनाच्या भाषा संचालनालयाने राज्याच्या सेवेत असलेल्या राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा घेण्याची घोषणा केलीय.  २८ जूनला ही परीक्षा होणार आहे.  या परीक्षेला मराठी अभ्यास केंद्राने विरोध केला आहे. मराठी भाषिक राज्यात हिंदीची परीक्षा कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तीचा भाग म्हणून घेण्याची आवश्यकताच काय ? असा केलाय.  सवाल करत प्रस्तावित हिंदी परीक्षा तत्काळ रद्द करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा केंद्राने दिला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेचे ज्ञान आवश्यक करून त्यासाठी परीक्षा घेणे हा निव्वळ खोडसाळपणा आणि राजभाषा मराठीचा अवमान असल्याचा आरोप मराठी अभ्यास केंद्राने केला आहे.

दरम्यान यावर मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ.दीपक पवार यांनी आक्षेप घेतला असून सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. हिंदी भाषा सक्तीविरोधात आमच्या भूमिकेसोबत मनसे पक्ष सोबत असेल तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असं मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं या हिंदी परीक्षेला कडाडून विरोध केलाय. 

मराठी भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे- सामंत

हिंदी परीक्षेबाबतचा निर्णय का घेतला याची माहिती घेणार- सामंत

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola