Rain SuperFast : राज्यात पावसाची तुफान बॅटिंग, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 15 सप्टेंबर 2025
आज राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे ढगफुटी सदृश पावसाची नोंद झाली. यामुळे ग्रामपंचायतच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले. करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी घटनास्थळी पाहणी केली. सोलापूर आणि बार्शीतील अनेक नद्या-नाल्यांना पूर आला आहे. पुरामुळे हत्तीस ते वैरा पुलावरील वाहतूक ठप्प झाली. प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातही सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा शहर जलमय झाले असून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता NDRF च्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. बीडच्या गेवराईमधील गोदावरी नदी क्षेत्रातही पावसाने झोडपले असून नदीकाठच्या बत्तीस गावांना पुराचा वेढा पडला आहे. शनिमंधिर आणि पंचाळेस्वर मंदिर पाण्याखाली गेले आहेत. माजलगावमध्ये सरस्वती नदीला सलग तिसऱ्या दिवशी पूर आला आहे. लेंडी नदीही दुथडी भरून वाहत आहे. अंबेजोगाई, धारूर, हिंगणी, कांदेवाडी परिसरातही मुसळधार पाऊस झाला. अहिल्यनगरमधील शेवगाव, पाथर्डी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झाला. तिसगाव येथील नदीला शंभर वर्षांनंतर मोठा पूर आला. कापूस आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले. परभणी शहरात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. विष्णूपुरी धरणाचे बारा दरवाजे उघडले आहेत. सिन्ना कोळेगाव प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले आहेत. पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.