State Dam Water Leve:| राज्यातील धरणातील पाण्याची सद्यस्थिती ABP Majha

Continues below advertisement

राज्यात  गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोयना महाबळेश्वर नवजा या परिसरात पावसाचा जोर कायम असून गेल्या 24 तासात या परिसरात 90 ते 110  मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाचे दरवाजे आणखी उघडले जाणार आहेत. सध्या कोयना धरणाचे दरवाजे अडीच फुटांवर , कोयना धरणातून 25 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज आणखी दरवाजे वर उचलले जाण्याची शक्यता आहे. सध्या कोयना धरणा मध्ये 104 टीएमसी पाणीसाठा असून नदी पात्रालगत असलेल्या गावांनी नदी पात्रात जाऊ नये, सतर्क रहावे असं आवाहन कोयना प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

तर नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या समाधानकारक पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ, गंगापूर, दारणा, पालखेड धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram