Heavy Rain Crop Loss : आभाळ फाटल्यासारखा अवकाळी पावसाचा मारा, रातोरात पिकांचा कचरा

Continues below advertisement

गेल्या काही दिवसांत आभाळ फाटल्यासारखा अवकाळी पावसाचा मारा सुरूय. त्यामुळे, रातोरात पिकांचा कचरा आणि शिवारांचा चिखल झालाय. कांदा, वाटाणा, मका, ज्वारी, बाजरी, गहू, डाळिंब, आंब्यासह अनेक पिकांचं मोठं नुकसान झालंय. महाराष्ट्रातील तब्बल ३४ हजार हेक्टरवरील पिकांची मोठी नासधूस झालीय. खरंतर, आधी मार्च महिन्याच्या सुरूवातीला पडलेल्या अवकाळीने शेतकऱ्यांना रडवलं, त्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा गुढीपाडवा कडू करून टाकला होता. आणि आता गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं पुन्हा कंबरडं मोडलंय. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता सरकारकडे लागले आहेत. सरकार पाऊस थांबवू शकत नाही, मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू तर नक्कीच पुसू शकतं, म्हणून सरकारने लालफितीचा कारभार याच अवकाळीच्या डबक्यात फेकून, तातडीने मदतीची पेरणी करावी अशी मागणी आता शेतकरी करतायत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram