Flood Farmer Relief : 31,628 कोटींच्या मदतीवरून राजकारण तापले Special Report

Continues below advertisement
सरकारने अतिवृष्टीसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. या मदतीवरून आता राजकारण तापले आहे. विरोधकांनी या मदतीला 'आकड्यांचा खेळ' असे संबोधत सरकारवर आरोप केले. यावर महायुतीने विरोधक केवळ राजकारण करत असल्याचा प्रत्यारोप केला. फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करत, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात 'फुटक्या कवडीचीही' मदत केली नसल्याचे म्हटले. या टीकेमुळे ठाकरेंचे शिलेदार संतप्त झाले आणि त्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांच्या पोटात असलेली आग सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शेतकरी नेते अजित नवले यांनी या पॅकेजवर तीव्र संताप व्यक्त केला. "पॅकेज नव्हे तर सरकारनं नुकसानग्रस्तांच्या हाती भोपळा दिला" असे ते म्हणाले. ३१ हजार ६२८ कोटी रुपये ही आकड्यांची चलाखी असून, जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे, अशी टीका त्यांनी केली. सध्याचे संकट मोठे असून, अशा स्थितीत नेत्यांनी राजकारण टाळणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola