Maharashtra Heat Wave : राज्यातल्या अनेक शहरात पारा 40 अंश सेल्सियसच्या पार ABP Majha

राज्यातल्या अनेक शहरात पारा ४० अंश सेल्सियसच्या पार गेलाय. हवामान खात्यानं आज विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय. विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. कालही विदर्भातल्या अनेक शहरांचा पारा ४० अंशांपार गेला होता. इकडे कोकणात ठाणे आणि रायगड जिल्ह्यात उष्णतेची लाट असली तरी कोकणातलं तापमान स्थिर आहे.. या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी आहे. मुंबईतली मात्र उष्णतेची लाट ओसरली असं हवामानखात्यानं सांगितलंय. या आठवड्याच्या अखेरीस परिस्थिती सुधारण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola