Maharashtra Heat : विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, तापमान 47 ते 48 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज
Continues below advertisement
गेले काही दिवस राज्यात उष्णतेची लाट पाहायला मिळतेय. त्यातच आता विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. विदर्भातील तापमान चार ते पाच अंशांनी वाढून पुढील पाच दिवस उष्णतेची लाट राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. उत्तरेकडील राज्यात उष्णतेची लाट आल्याने विदर्भासह राज्यातील अन्य भागात तापमान वाढण्याची शक्यता आहे. सध्या विदर्भातील कमाल तापमान 44 अंश सेल्सियसपुढे गेले आहे. त्यात आणखी चार ते पाच अंशाने वाढ होत तापमान 47 ते 48 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण एकीकडे राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असताना राज्याच्या दक्षिण भागात मात्र ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, मुंबईत काल 38 अंश तापमानाची नोंद झालीय.
Continues below advertisement