Rajesh Tope PC | गरिबांना मोफत लस देण्याबाबत केंद्राकडे आग्रह धरणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Continues below advertisement

दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना कोरोना लस मोफत मिळालीच पाहिजे असा आग्रह राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धरला आहे. मोफत लसीबाबत केंद्राने निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. मात्र गरिबांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं राजेश टोपे म्हणाले. महाराष्ट्रात गरिबांना मोफत लस मिळणार असल्याचे हे संकेत तर नाही अशी चर्चा आता रंगू लागली आहे. तसंच राज्यात 8 जानेवारीला सर्व जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचं ड्राय रन होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. 

मुंबईत कोरोना लसीकरण आणि नव्या विषाणूसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत राजेश टोपे बोलत होते. यावेळी कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनचे राज्यात एकूण आठ रुग्ण असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram