Chandrakant Patil : मेडिकल, इंजिनिअरिंगसह 800 अभ्यासक्रमाचं मुलींना मोफत शिक्षण
Continues below advertisement
येत्या जूनपासून राज्यात ज्या मुलींच्या पालकांचे आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना मेडिकल असो की इंजिनिअरिंग जवळपास ६०० अभ्यासक्रमांचे शिक्षण मोफत दिले जाणार आहे. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान चंद्रकांत पाटलांच्या घोषणेनंतर मुलांमध्ये नाराजी पसरली आहे. कार्यक्रम संपल्यानंतर पाटील यांना या मुलांनी अडवत फक्त मुलींनाच मोफत का, या उत्पन्नाखालील मुलांना देखील मोफत करावे अशी मागणी केली.
Continues below advertisement