Unlock 5.0 | राज्यात लवकरच सिनेमागृह सुरु करण्याचा विचार : अमित देशमुख
केंद्रीय गृहमंत्रालयाने अनलॉक 5 अंतर्गत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. (Unlock 5 Guidelines) अनलॉक पाचमध्ये 15 ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल, चित्रपटगृह उघड्यास परवानगी दिली आहे. अशातच केंद्र सरकारच्या वतीने आज चित्रपटगृह सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सिनेमागृह सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने आज निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं.
केंद्र सराकारच्या परवानगीनंतर राज्यातील सिनेमागृह कधी सुरु करणार यांसदर्भात विचारल्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख म्हणाले की, 'सिनेमागृह सुरु करण्याबाबत केंद्र सरकारने आज निर्णय घेतला असून आज नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. नवरात्र, दसरा, दिवाळी हा चित्रपटांसाठी, नाट्यगृहासाठी मौसम असतो, त्यामुळे चित्रपगृह सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. यासंदर्भात आम्ही सकारात्मक असून लकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत.'
'महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळे शिथीलता देण्याआधी विचार करू मगच निर्णय घेऊ. गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे सिनेसृष्टी आणि नाट्यसृष्टी अडचणीत आहे. त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. त्यामुळे त्यांना त्यातून बाहेर कढण गरजेचं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात चित्रपटगृ सुरु होण्यासंदर्भात काही दिवसांतच चित्र स्पष्ट होईल.' असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी बोलताना सांगितलं.