Maharashtra Flood : अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींच्या मदतीची ABP Majha
राज्यातल्या पूरग्रस्त आणि अतिवृष्टी बाधितांसाठी ठाकरे सरकारने मोठी मदत जाहीर केली. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आलाय. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना १० हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात आलेल्या पूरामुळे तसंच अतिवृष्टीमुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतीपिकांचं नुकसान झालं. त्यामुळे एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता नैसर्गिक संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आपण मदत जाहीर केल्याचं सरकारतर्फे सांगण्यात आलं.