Maharashtra Language Row | राज्यपाल C.P. Radhakrishnan यांची पहिली प्रतिक्रिया, 'द्वेषामुळे राज्याचं नुकसान'
मराठी आणि हिंदी भाषेतील वादावर राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाषेवरून द्वेष पसरवल्यास राज्याचं दीर्घकाळ नुकसान होऊ शकतं, असं राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. "जर आपण अशा प्रकारचा द्वेष पसरवला, तर कोण गुंतवणूक करायला येईल? कोणताही गुंतवणूकदार येणार नाही. कोणताही उद्योग येणार नाही. दीर्घकाळात आपण महाराष्ट्राचं नुकसान करत आहोत," असं त्यांनी स्पष्ट केलं. भाषिक द्वेष पसरवण्यापासून दूर राहण्याचं आवाहनही राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी जनतेला केलं आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे, यावर कोणतीही तडजोड नाही, असंही त्यांनी नमूद केलं. मात्र, याचा अर्थ इतर मातृभाषांचा अनादर करू नये, असंही त्यांनी सांगितलं. अशा वृत्तीमुळे राज्याच्या विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असंही त्यांनी अधोरेखित केलं.