Omicron : कर्नाटकात ओमायक्रॉन व्हेरियंटचे 2 रुग्ण, महाराष्ट्रात खबरदारी घेण्याची गरज
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
02 Dec 2021 09:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतात ओमायक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झालाय..कर्नाटकात ओमायक्रॉन व्हेरियंटचे 2 रुग्ण आढळले आहेत..केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. आफ्रिकेतून आलेले 66 आणि 46 वर्षाचे दोन रुग्ण ओमायक्रॉन व्हेरियंटनं संक्रमित आढळून आले आहेत. महाराष्ट्राच्या वेशीवर ओमायक्रॉनचे 2 रुग्ण आढळल्यानं राज्यातही खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान कर्नाटकात ओमायक्रॉन व्हेरियंटनं बाधित झालेल्या प्रवाशाच्या संपर्ता एकूण 218 जण आले होते.. यातल्या 5 जणांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.पण या 5 जणांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालीय की नाही याचा अहवाल मात्र प्रलिबंत आहे.