Maharashtra : राज्यातील वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यांची बदली, जाणून घ्या कोण आहेत हे अधिकारी
abp majha web team
Updated at:
21 Apr 2022 06:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPolice Transfer News : पोलीस दलातील बदल्यांच्या (Police Transfer) विषयावरून राज्याच्या राजकारणात मोठे वादंग निर्माण झाले. सुमारे दोन वर्षांपूर्वी पोलिसांच्या बदल्यांवरून सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप, चौकशी आणि न्यायालयीन खटले अद्याप थांबलेले नाही. मात्र, त्याच पोलीस दलातील बदल्यांमध्ये आता एक छोटा मात्र अत्यंत सकारात्मक बदल पाहायला मिळतंय. कारण नागपुरात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये कमालीची पारदर्शकता आणण्यात आली आहे. पोलीस दलातील बदल्यांचा नागपुरी पॅटर्न (Nagpur Pattern) आहे तरी काय?