OBC : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी नवा कायदा आणणार? पाहा काय म्हणाले Chhagan Bhujbal

Continues below advertisement

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत ही महविकास आघाडी शासनाची भूमिका असून ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन  सोमवारी विधिमंडळात  विधेयक मांडणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
विधान परिषदेत  ओबीसी आरक्षण प्रश्नावर  नियम 289 अन्वये उपस्थित विषयावरील चर्चेला उत्तर देताना  उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी माहिती दिली.
 सभागृहातील सर्वच सदस्य ओबीसी आरक्षणाच्या बाजूने असून निवडणुका कधी घ्यायच्या याचा अधिकार निवडणूक आयोगाला असून या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नयेत यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे विधेयक सोमवारी विधिमंडळात मांडण्यात येणार आहे. या विधेयकाला सर्वांनी एकमताने पाठिंबा द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी करून राज्य शासनावर कोणाचा कसलाही दबाव नाही. शासनावर कुणीही दबाव टाकू शकत नाही, असेही  त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram