Maharashtra : मंत्र्यांच्या उपचारासाठी कोटींचा खर्च, पाहा कोणत्या मंत्र्यावर किती झाला खर्च

Continues below advertisement

कोरोना काळात राज्यातल्या 18 मंत्री आणि कुटुंबीयांवर खासगी रुग्णालयात उपचार करून घेतले आणि त्यासाठी सरकारच्या तिजोरीतून 1 कोटी 40 लाख रुपयांची बिलं अदा करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.  त्यात सर्वाधिक 34 लाख रुपये आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासाठी खर्च करण्यात आलेत. नाशिकमधील पत्रकार दीप्ती राऊत यांनी आरटीआयअंतर्गत ही माहिती मागवली आहे. कोरोना काळात खासगी रुग्णालयातील अवाजवी बिलांनी सर्वसमान्य जनता भरडली गेली. तर मंत्र्यांनी मात्र सरकारी तिजोरीतील पैशांतून खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपचारांवर झालेला खर्च नियमानुसारच असला तरी सरकारी आरोग्य व्यवस्थेवर मंत्र्यांचाच भरवसा नाही का असा सवाल यातून उपस्थित होतोय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram