Omicron Variant : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या धोक्यामुळे सरकार पुन्हा अॅक्शन मोडमध्ये
कोरोना संकटातून आता कुठे आपण हात झटकून उभे राहत असताना आता एक नव्या व्हेरियंटचा धोका समोर समोर उभा ठाकलाय. दक्षिण आफ्रिकेत हा नवा व्हेरियंट सापडल्यानंतर आता सरकार अॅक्शन मोडमध्ये आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत दीड तास चर्चा केलेय. या उच्चस्तरीय बैठकीत या नव्या व्हेरियंटसाठी कशा पद्धतीनं नियम असावे, काय निर्बंध लादावे यावर सखोल चर्चा झाल्याची माहिती आहे इकडे स्वतः मुख्यमंत्रीदेखिल राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. तर ओमिक्रॉनला रोखण्यासाठी पालिकाही सज्ज झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या नागरिकांवर विशेष निर्बंध लावण्याची तयारी मुंबई महापालिकेनं केलेय.