Mahayuti Government | सरकारमध्ये 'शीतयुद्ध'? एकाच पदासाठी दोन आदेश, 'CM-DCM' खात्यात गोंधळ!

सरकारी खात्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे मोठा गोंधळ समोर आला आहे. बेस्टच्या अतिरिक्त महाव्यवस्थापक पदासाठी दोन स्वतंत्र आदेश काढण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाने आशिष शर्मा यांचे नाव पुढे केले, तर नगरविकास विभागाने अश्विनी जोशी यांची नियुक्ती केली. यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विभागांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आमदार रोहित पवार यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले, "सामाजिक प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गतच येतं. आणि जर सामाजिक प्रशासनाने वेगळा आणि मुख्यमंत्र्यांनी वेगळा काढला असेल तर या सरकारमध्ये चाललंय तरी काय? असा प्रश्न निर्माण होतो." यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देत सांगितले, "तीन जणांचं सरकार योग्य पद्धतीने चाललंय." या दुहेरी आदेशामुळे नेमकी माघार कोण घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola