OBC Meeting : ओबीसी आणि सरकारच्या शिष्टमंडळाची बैठक, कुणबी नोंदींचा प्रश्न सुटणार ?
Continues below advertisement
OBC Meeting : ओबीसी आणि सरकारच्या शिष्टमंडळाची बैठक,कुणबी नोंदींचा मुद्दा सर्वाधिक वादाचा ठरणार,...
आजच्या दिवसातील सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे ओबीसी आंदोलक आणि सरकराची बैठक.. मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार आहे. ओबीसी आंदोलकांचं शिष्टमंडळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, भाजप नेत्या पंकजा मुंडे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मराठा समाजाला ५४ लाख नोंदींप्रमाणे दिलेलं कुणबी आरक्षण रद्द करावं, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही हे सरकारने लेखी द्यावं तरच आंदोलन मागे घेण्यात येईल अशी मागणी लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी वाघमारे यांनी केलीय.
Continues below advertisement