Waqf board म्हणजे नेमकं काय? निधी देण्यावरुन का निर्माण झाला वाद? | What is waqf Board

Continues below advertisement

Waqf board म्हणजे नेमकं काय? निधी देण्यावरुन का निर्माण झाला वाद? | What is waqf Board

Vishva Hindu Parishad : वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर विश्व हिंदू परिषदेनं राज्य सरकारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. विहिंप नेते लवकरच राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची याप्रकरणी भेट घेणार आहे. आरएसएसनंतर आता विहिंप ही भाजपवर नाराज असल्याचं समोर आलेय. भाजप शिवसेनेच्या राज्य सरकारला हिंदुत्वाचा वारसदार म्हणावं की नाही? हिंदुत्वाचा वारसा सांगणाऱ्या सरकारने वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देण्याचा निर्णय करणे दुर्दैवी... हिंदू समाजाने हे केव्हापर्यंत सहन करावे, असा सवाल विहिंपने उपस्थित केलाय. 

हिंदुत्वाचे वारसदार म्हणावं की नाही

राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाने वक्फ बोर्डासाठी दहा कोटींचा निधी दिल्यामुळे विश्व हिंदू परिषदेने भाजप - शिवसेनेच्या हिंदुत्ववादाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त  केली. राज्य सरकारने वक्फ बोर्डाला निधी देण्याचा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. "राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून हिंदुत्वचा वारसा घेऊन चालणारे सरकार जर अशी कारवाई करणार असेल, तर त्यांना हिंदुत्वाचे वारसदार म्हणावं की नाही म्हणावं असा प्रश्न जनतेसमोर निर्माण होत असल्याची तीव्र भावना विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र-गोवा प्रांत महामंत्री गोविंद शेंडे यांनी व्यक्त केली." 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram