Nilesh Ghaywal : घायवळ प्रकरणावरून Rohit Pawar, Ram Shinde यांच्यात 'व्हिडिओ वॉर'
Continues below advertisement
गुंड नीलेश घायवळ आणि भाऊ सचिन घायवळ यांच्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचा सामना सुरू आहे. गुंड नीलेश घायवळचा विधान परिषद सभापती राम शिंदेंचा पाया पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओवरुन रोहित पवारांनी राम शिंदेंवर निशाणा साधत बाजार समिती निवडणुकीमध्ये घायवळचा उपयोग केल्याचा आरोप केला. यानंतर भाजपने सचिन घायवळचे रोहित पवारांसोबतचे फोटो ट्वीट केले. रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांसोबत नीलेश घायवळचा कोविड काळातील व्हिडिओही व्हायरल झाला, ज्यात त्यांनी घायवळने केलेल्या मदतीबाबत कौतुक केले होते. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवारांचा सचिन घायवळसोबतचा फोटो दाखवत प्रश्न विचारले. रोहित पवारांनी त्यांचा सचिन घायवळसोबतचा फोटो सात ते आठ वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले. तसेच, "माझी आई राजकारणात नाही, समाजकारणामध्ये आहे. माझ्या आईचा फोटोचा नाही ते व्हिडिओचा वापर करून तुम्ही जर गलत राजकारण करत असाल त्याचा एकच अर्थ निघतो. मला समोर जायला कुठेतरी भाजप आहे," असे रोहित पवारांनी स्पष्ट केले. या प्रकरणावरून राजकीय वैर वाढले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement