Maharashtra : देवा तुला शोधू कुठं? नंदी दूध पित असल्याच्या अफवांना उधाण
abp majha web team
Updated at:
06 Mar 2022 07:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात अनेक जिल्ह्यात नंदी दूध पित असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. औरंगाबाद, धुळे, जालना, जळगाव, नाशिक, बुलढाणा, अमरावती, वाशिमध्ये या अफवा पसरल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी नागरिक मंदिरात जाऊन नंदीला दूध पाजत असल्याचं समोर आलं आहे.. तर तिकडे जळगाव, नाशिकमध्ये नंदीला दूध पाजण्यासाठी नागरिकांच्या मंदिराबाहेर रांगा लागल्याचं समोर आलं आहे.. तर मलकापूरमध्ये नंदी दूध पीत असल्याचं माहित होताच मंदिरात भजन किर्तनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. दरम्यान नंदी दूध पित असल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आलं आहे.