अकरावी प्रवेशासंदर्भात एक महत्वाची बातमी येत्या १६ ऑगस्टपासून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे ,पिंपरी-चिंचवड नाशिक ,अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. या शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सोईसाठी संकतस्थळावर १३ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना सरावासाठी तात्पुरती नोंदणी करता येणार आहे