Maharashtra Floods | Buldhana मधील Pentakali Dam चे दरवाजे उघडले, Kharif पिकांचे मोठे नुकसान
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी धरण प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणामधून पैनगंगा नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीकाठावरच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. नदीकाठावरची शेकडो हेक्टर शेती सध्या पाण्याखाली गेली आहे. या शेतीमध्ये पाणी साचले आहे. यामुळे पिकांना आधीच बसलेल्या फटक्यानंतर आता शेतात पुराचे पाणी साचल्याने खरीप हंगामाच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने चिंता वाढली आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.