Beed Floods | सिंदफना नदीचं रौद्ररूप, घरं-दुकानं पाण्याखाली, मदतीची हाक
Continues below advertisement
बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे सिंदफना नदीने रौद्ररूप धारण केले आहे. नदीकाठावरील अनेक गावे, बाजारपेठा आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तू, किराणा माल, फ्रिज, कूलर, टेबल, बाकडी, डाळी आणि तेल डब्बे पूर्णपणे वाहून गेले आहेत. शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एका नागरिकाने सांगितले, "माझा सगळा संसार हे आता सध्या पाण्यात आहे मी कपड्यांनी फक्त बाहेर निघाला आहे." यामुळे नागरिकांनी शासनाकडे मदतीची विनंती केली आहे. प्रशासनाने तातडीने मदत करून गरिबांची घरे पुन्हा उभी करावीत, अशी मागणी पूरग्रस्तांकडून होत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement