Flood : दोन महिन्यानंतर केंद्रीय पथकाला काय भीषणता कळणार? पूरग्रस्तांचा केंद्राला संतप्त सवाल

Continues below advertisement

 जुलै महिन्यात आलेल्या पूर व भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा  आज केंद्रीय पथकाने घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेऊन या पथकाने आयर्विन पूल, मौजे डिग्रज आणि शिरगाव मधील नागरिकाशी संवाद साधत पुराच्या नुकसानीबाबत माहिती घेतली. वास्तविक जुलै मध्ये पूर आला आणि  तब्बल सव्वादोन   महिन्यांनंतर केंद्रीय पथक पाहणीसाठी आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. जर हाच पाहणी दौरा पूर आल्यानंतरच लगेच जर झाला असता तर महापुराची भीषणता केंद्रीय पथकाला देखील लक्ष्यात आली असती अशी भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.  सांगली जिल्ह्यातील पलूस, वाळवा, मिरज, शिराळा या तालुक्यात महापुराने  एक हजार कोटींवर नुकसान झाले. जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाने आतापर्यंत १५० ते २०० कोटींचा निधी दिला आहे; पण या निधीत पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दमडीही मिळाली नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. निदान या केंद्रीय पथकाच्या दौऱ्यानंतर देखील कृष्णा आणि वारणा नदी काठच्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याची आशा आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram