Farmer Loss : महापूर ओसरला, शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत, मंत्र्यांचं आश्वासन हवेतच विरलं?

Continues below advertisement
धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील चिंचपूर ढगे गावात महापुराने केलेल्या नुकसानीची पाहणी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी करून महिना उलटला, तरी शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. 'आता महिना उलटला तरी मदत मिळालेली नाही,' हे हवालदिल उद्गार आहेत मोरे कुटुंबाचे, ज्यांच्या द्राक्ष बागेत स्वतः मंत्री महोदयांनी पाहणी केली होती. दिवाळीपूर्वी मदत देण्याचे सरकारचे आश्वासन हवेतच विरले असून, उद्ध्वस्त झालेली द्राक्षाची बाग आणि वाहून गेलेल्या जनावरांचा पंचनामा कसा द्यायचा, यासारख्या प्रश्नांनी शेतकरी खचला आहे. प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी केलेल्या पाहणीत शेतकऱ्यांची ही विदारक स्थिती समोर आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola