Maharashtra Flood : पूरग्रस्त, दरडग्रस्तांच्या मदतीसंदर्भात आजच घोषणा होणार : मंत्री विजय वडेट्टीवार
राजू सोनावणे
Updated at:
28 Jul 2021 12:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरड कोसळून आणि महापुरामुळं महाराष्ट्रात अतोनात नुकसान झालंय...रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा यासह राज्यातल्या एकूण सात जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसलाय... आता या जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी ठाकरे सरकार कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. नुकसानग्रस्तांसाठी आजच मदतीची घोषणा होईल, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. पूरग्रस्त आणि नुकसान झालेल्या कुणालाही महाविकास आघाडीचं सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असं म्हणत वडेट्टीवारांनी पूरग्रस्तांना आश्वस्त केलंय